घरक्राइममेसेजच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

मेसेजच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Subscribe

वरखेडामधील घटना; वणी पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

वणी :  मोबाईवर शिवीगाळ केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी तालुक्यातील वरखेडामध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. मेसेज टाकल्याच्या वादातून एका गटाने दुसर्‍या गटातील व्यक्तींना प्लास्टिक नळी व काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरुन वरखेडा येथील 11 संशयीतांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल भिकाजी भुसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोबाईलवरुन शिवीगाळ केली म्हणून त्यांना मेसेज पाठविला. त्याचा राग आल्याने संशयित आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून भुसाळ यांच्या घरासमोर आले. भुसाळ यांना घराबाहेर बोलावून मेसेज का पाठविला. त्यावर भुसाळ यांनी शिवीगाळ केली म्हणून मेसेज पाठविला, असे सांगितले. त्याचा राग आल्याने ड्रीपची प्लास्टिकची नळी व लाकडी काठीने भुसाळ यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साक्षीदारांनाही संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश रघुनाथ भुसाळ, टिभु श्रीराम भुसाळ, कैलास श्रीराम भुसाळ, तुळशीराम श्रीराम भुसाळ, भास्कर तुळशीराम भुसाळ, बाजीराव श्रीराम भुसाळ, उत्तम श्रीराम भुसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

भास्कर तुळशीराम भुसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उत्तम भुसाळ यांनी मोबाईलवर शिवीगाळ केल्याचे मेसेज का टाकले, अशी विचारणा केली असता तुम्ही माझा मुरुमाचा ट्रक्टर पकडून दिला. तुमच्यामुळे मला दंड बसला, असे संशयितांनी सांगितले. यापुढेही मेसेज टाकणार, असे बोलल्याने वादाचे रुपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले. संशयितांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अनिल भिकाजी भुसाळ, गिरीश अनिल भुसाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत करत आहेत.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -