घरमहाराष्ट्रनाशिक६७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

६७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

Subscribe

प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि.21) पाच वाजेनंतर थंडावल्या

सात तालुक्यांमधील 67 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 23) सकाळी 7.30 ते दुपारी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि.21) पाच वाजेनंतर थंडावल्या. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे.

नाशिकसह राज्यभरातील जुलै ते सप्टेंबर याकाळात मुदत संपणार्‍या 74 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारीनंतर सात ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये निफाडच्या 3, इगतपुरीच्या 2 तसेच दिंडोरी व कळवणच्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित 67 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 23) मतदान होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेनंतर प्रचार थंडावला आहे. मतदानासाठीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतदान अधिकारी-कर्मचार्‍यांना शनिवारी (दि. 22) तालुक्याच्या ठिकाणी अखेरचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ‘ईव्हीएम’ व मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होेतील.

- Advertisement -

81 जागा बिनविरोध

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह 224 ग्रामपंचायतींमधील 422 रिक्तपदांसाठी निवडणुका घेण्यात येत आहेत. अर्ज माघारीनंतर 81 जागा या बिनविरोध ठरल्या आहेत. दरम्यान, एकही अर्ज न आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भविष्यात नव्याने निवडणूक प्रक्रिया प्रशासनाला राबवावी लागणार आहे.

सार्वत्रिक ग्रामपंचायती

निफाड : 18
इगतपुरी : 34
नांदगाव : 01
त्र्यंबकेश्वर : 05
कळवण : 09

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -