घरमहाराष्ट्रनाशिकएक थेंबही गुजरातला जाऊ देणार नाही

एक थेंबही गुजरातला जाऊ देणार नाही

Subscribe

देवळा येथील जाहीर सभेत माजी आमदार नितीन भोसले यांचे आश्वासन

नाशिककरांच्या इच्छेविना पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नसल्याचे पिंपळगाव येथील सभेत पंतप्रधान नरेंद मोदी भाषणात पूर्णतः खोटे बोलले, असा आरोप गुरुवारी (२५ एप्रिल) मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी केला. मरेपर्यंत लढू पण महाराष्ट्राचे एक थेंब पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, असे यावेळी भोसले यांनी सांगितले.

देवळा येथे आयोजित माकप उमेदवार आमदार जे. पी. गावित यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री पाणी प्रश्नाबाबत खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. जलसंपदा विभागाशी झालेल्या पत्र व्यवहार व त्यातून मिळालेले उत्तर नेमके काय सांगतो, ही बातमी पहा म्हणत ‘आपलं महानगर’ च्या अंकात प्रसिध्द ‘थेंबभर नव्हे, तब्बल १६ टीएमसी पाणी गुजरातला पळवण्याचा डाव’ बातमी दाखवत हा घ्या पुरावा म्हणत उपस्थित जनतेले दाखवले. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनाही अंक वाचण्यासाठी दिला. पालकमंत्री गिरीश महाजन साफ खोटे बोलत असून महाजन यांनी राजीनामा द्यावा अन्यथा लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असे म्हणत भोसले यांनी पालकमंत्र्यांवरही निशाना साधला.

- Advertisement -

नाशिक जिल्हा पाणीप्रश्नाबाबत अस्वस्थ असताना मूठभर व्यापार्‍यांसाठी १ लाख कोटी खर्च बुलेट ट्रेन सत्ताधारी करायला तयार आहेत. मात्र, त्यापेक्षा खूप कमी खर्च गिरणा व गोदावरी खोर्‍यात पाणी आणण्यासाठी लागणार आहे त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नसून महाराष्ट्राचे १६ टीएमसी पाणी गुजरातला पळण्याचा डाव सुरू आहे. मात्र, असे होऊ दिले जाणार नाही. मरेपर्यंत लढू पण महाराष्ट्राचे एक थेंब पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, असे यावेळी भोसले यांनी सांगितले. प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी आपलं महानगरचे आभार मानले.

 बच्चू कडूंची अनुपस्थिती

सभेचे मुख्य आकर्षण असलेले आमदार बच्चू कडू सभेस काही कारणास्तव उपस्थित राहू न शकल्याने खास बच्चू कडू यांना ऐकण्यासाठी आलेल्यांची निराशा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -