Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम दिराच्या प्रेमात महिला वेडावली; दोघांच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

दिराच्या प्रेमात महिला वेडावली; दोघांच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्येही पत्नी आणि दिराच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी महिलेची सून आणि पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या घटनेत कपिल सुरेश भूतकर (रा. आर्या हाईट्स, कडेपठार चौक, श्रमिकनगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतण्या भागवत रामभाऊ भुतकर (रा. कोणार्कनगर, आडगाव शिवार, नाशिक) आणि सून यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती पती व तक्रारदार महिला अर्थात सासूला समजली होती. त्यातून सून आणि पुतण्या हे मुलाचा छळ करत होते. दोघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. कपिल भूतकरांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. याउलट त्रास अधिकच वाढला होता. या दोघांचा छळ असहाय झाल्याने कपिल भूतकर यांनी मंगळवारी (दि.६) राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सून आणि पुतण्या भागवत रामभाऊ भुतकर या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे मुलगा कपिल याने आत्महत्या केल्याचे अरूणा भूतकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

- Advertisement -