घरमहाराष्ट्रदेवळाली रेल्वे स्टेशन परिसरात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

देवळाली रेल्वे स्टेशन परिसरात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

Subscribe

देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे ही धकमी देण्यात आली.

पुलवामा हल्ल्यानंतर देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. अशातच महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर देवळाली रेल्वे स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी देवळाली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बेवारस बॅग सापडली होती. आर्मी रेस्ट हाऊस येथील एका कचरा पेटीमध्ये ही बॅग सापडली. बॉम्बशोधक पथाने घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या आणि खाद्यपदार्थ सापडले. त्यामुळे या बॅगपासून कसलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. त्यामुळे बॉम्बशोधक पथकासह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही बॅग कोणाची याबाबत अद्याप उलगडा झाला नाही.

धमकी आल्याने खळबळ

देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे ही धकमी देण्यात आली. या पत्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा पोलीस सतर्क होत त्यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. बॉम्ब शोधक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला. दरम्यान, बॉम्बशोधक नाशक पथकाद्वारे रविवारी देवळाली रेल्वे स्थानक आणि परिसराची तपासणी करण्यात आली. या पथकाकडून श्वानांमार्फत संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र कोठेही कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.

- Advertisement -

बेवारस बॅग सापडली

दरम्यान, आज सकाळी देवळाली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बेवारस बॅग सापडली सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. आर्मी रेस्ट हाऊस येथील एका कचरा पेटीमध्ये ही बॅग सापडली. आर्मी रेस्ट हाऊस येथील एका कचरा पेटीमध्ये ही बॅग सापडली. माहिती कळताच पोलीस, श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल केले. बेवारस बॅगची तपासणी करण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच संशयास्पद गोष्ट आढळली नाही. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, ही बॅग कोणाची आहे आणि इथे कशी आली याचा तपास सुरु आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यातच देवळाली रेल्वे स्टेशन उडवण्याचे निनावी पत्र आल्यामुळे या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशनसह परिसराची पहाणी करत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. देवळाली रेल्वे स्थानक बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासण्यात आले. मात्र कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -