घरमहाराष्ट्रसामूहिक विवाह स्पर्धा: राज ठाकरे ५०० तर भाजपचं १००० लक्ष्य

सामूहिक विवाह स्पर्धा: राज ठाकरे ५०० तर भाजपचं १००० लक्ष्य

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५०० आदिवाशी जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न केल्यानंतर भाजपने हजार जोडप्यांच्या लग्नाचा टार्गेट पूर्ण केला आहे. मात्र या लग्नात अनेक गोष्टींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सध्या राज्यात सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्याचे टार्गेट असल्याचे चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नमुहूर्तावर ५०० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. याहून एक पाऊल पुढे भाजपने १ हजार लग्न लावण्याचा विक्रम केला आहे. कसारा येथील शहापूर येथे हा विवाह सोहळा पार पडला आहे. मात्र या विवाह समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती. हजार जोडप्यांची लग्न लावून देण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुलं झालेल्या जोडप्यांनाही बोहल्यावर चढवले असल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्टंटबाजी करण्याच्या नादात भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या संस्थेद्वारे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

लग्नातील घोटाळे

अल्पवयीन मुलांचे लावले लग्न – नियमानुसार लग्नासाठी मुलाचे वाय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र विवाह सोहळ्यात भाजपने चक्क १९ वर्षाच्या यशवंत लहु बगळे या अल्पवयीन मुलालाही बोहल्यावर चढवले.

सरकार दुसरे काय देते – या विवाहत उभयत्यांना भांडी दिल्या गेलीत. अनेक वर-वधूंनी भांडी मिळतील लग्न करत असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पित्यासोबत मुलाचेही लग्न – या विवाह सोहळ्यात पित्या सोबत मुलाचेही लग्न लावण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या विवाहसोहळ्यात अनेक पद्धतीचा घोटाळा झाला असल्याचा दावा सामनाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -