घरमहाराष्ट्रस्म़ृती इराणींच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

स्म़ृती इराणींच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

Subscribe

स्मृती इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रीयांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीका कॉंग्रेसच्या आंदोलन कर्त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का? मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल?’ असा प्रश्न एका कार्यक्रमात केला होता. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रीया येत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात आंदोलन करुन स्मती इराणींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

एका कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करुन इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रीयांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

‘इराणी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान’

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरअध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान आहे. निसर्गाने स्त्रियांना दिलेल्या देणगीचा असा अपमान करणे त्यांना शोभत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्त्रिवर्गात असंतुष्टता निर्माण झाली आहे. स्मृती इराणी यांच्या वक्तव्यातून भाजपची मनुवादी मानसिकता दिसून येतेय. भाजपची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


हेही वाचा – शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या स्पीडबोटला अपघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -