घरताज्या घडामोडीराष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळणार; जयंत पाटलांनी सांगितला 'हे' कारण

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळणार; जयंत पाटलांनी सांगितला ‘हे’ कारण

Subscribe

'आगामी काळात वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका येतील, त्यामध्ये आमची कामगिरी सर्रस किंवा समाधानकारक झाली आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवून चांगली मतं मिळाली तर, हा राष्ट्रीय दर्जा आम्हाला पुन्हा मिळू शकतो', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.

‘आगामी काळात वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका येतील, त्यामध्ये आमची कामगिरी सर्रस किंवा समाधानकारक झाली आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवून चांगली मतं मिळाली तर, हा राष्ट्रीय दर्जा आम्हाला पुन्हा मिळू शकतो’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला व अध्यक्ष शरद पवार हा मोठा धक्का मानला जातो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (National party status will be restored to ncp Jayant Patil said reason)

‘टीव्ही 9’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळेल असे सांगितले. ‘राष्ट्रीय दर्जा कोणत्या पक्षाकडे राहु शकतो याचे काही निकष आहेत. मागील काही वर्षात राष्ट्रीय दर्जाबाबत आमची बाजू मांडली होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता निर्णय दिलेला आहे’, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात या विषयी जे निकष आहेत, त्या निकषामध्ये प्रत्येक निवडणुकीत काही फरक होतो असतो. आगामी काळात वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका येतील, त्यामध्ये आमची कामगिरी सर्रस किंवा समाधानकारक झाली आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवून चांगली मतं मिळाली तर, हा राष्ट्रीय दर्जा आम्हाला पुन्हा मिळू शकतो’, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

‘निवडणूक आयोगातील देशातील अनेक पक्षांबद्दल राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाकपाचाही निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष अनेक वर्ष जुना आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयाबाबत मतमतांतर आहेत. तसेच, या निर्णयाबाबत राष्ट्रवादीची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे’, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : स्थापनेनंतर दोन वर्षात मिळालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा २३ व्या वर्षी रद्द, वाचा राष्ट्रवादीचा इतिहास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -