घरमहाराष्ट्रगडचिरोलीत रस्तेबांधणीसाठीची वाहनं नक्षलवाद्यांनी जाळली

गडचिरोलीत रस्तेबांधणीसाठीची वाहनं नक्षलवाद्यांनी जाळली

Subscribe

रस्ते बांधकाम कामातील वाहन, टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्याची जाळपोळ करण्यात आली.

गडचिरोलीमध्ये नक्षवाद्यांनी पुन्हा हैदोस घातला आहे. रस्ते बांधणीच्या कामासाठी आणलेल्या वाहने पुन्हा नक्षलवाद्यांनी जाळली आहेत. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना घडली आहे. ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली. पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण कामासाठी ही वाहने आणण्यात आली होती. रस्ते बांधकाम कामातील वाहन, टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्याची जाळपोळ करण्यात आली. मध्यरात्रीच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केली आहे.

यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदार काम करीत असल्याची माहिती मिळत आहे. जाळण्यात आलेली वाहने आणि साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याचे देखील माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या दुर्गम भागात सुरू असलेल्या विकास कामांना नक्षलवादी विरोध करत आहे. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्यामुळे वाहनांचे आणि रस्ते कामाच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -