घरमहाराष्ट्रमाढातून संजय शिंदे, उस्मानाबादेत राणा जगजितसिंह राष्ट्रवादीचे उमेदवार

माढातून संजय शिंदे, उस्मानाबादेत राणा जगजितसिंह राष्ट्रवादीचे उमेदवार

Subscribe

राष्ट्रवादीने माढातून संजय शिंदे तर उस्मानाबाद मधून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढ्याचा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. मोहिते पाटील यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत शरद पवार यांनी माढा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे तर उस्मानाबादसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. बारामती येथे अप्पासाहेब पवार सभागृहात संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पवारांनी दोन्ही उमेदवारांची घोषणा केली.

आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, संजय शिंदे यांच्या प्रवेशाला मुळात प्रवेश का म्हणायचे? पक्षात छोटे मोठे वाद असतातच. त्यांच्या जाण्यामागे स्थानिक कारणे होती. विठ्ठलराव शिंदे हे माझे विधानसभेतील सहकारी होते. शिंदे परिवारासोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे संजय शिंदे यांना परके कसे म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी संजय शिंदे यांच्या प्रवेशाबाबतचा खुलासा केला.

- Advertisement -

पवार पुढे म्हणाले की, “मी एकेकाळी सोलापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा पुण्यापेक्षा अधिक संपर्क माझा सोलापूरकरांसोबत होता. माझे अनेक मित्र हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. मी जेव्हा माढातून उभा राहण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांनी मला सांगितले की, आम्ही तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. त्यामुळे माढातून संजय शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देताना मला आनंद होत आहे. तसेच उस्मानाबादसाठी राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देत आहोत. हे दोन्ही तरुण नेते नक्कीच चांगले काम करतील, अशी मला अपेक्षा आहे.”

हे वाचा – कोण आहेत संजय शिंदे?

- Advertisement -

अडलेले-नडलेले भाजपमध्ये गेलेत – शिंदे

सोलापूरचे नेतृत्व ज्यांच्या हातात दिले होते. त्यांनी चुकीचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण बिघडले. सोलापूरच्या नेतृत्वाताने सहकारी संस्थामध्ये चुका केल्यामुळे सामान्य कार्यकर्ता नाराज झाला. राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार त्यामुळे दुखावला गेला होता. ही परिस्थिती मी पवारांच्या कानावर टाकली होती, असे सांगत संजय शिंदे म्हणाले की मी राष्ट्रवादी पासून कधी लांब गेलो नव्हतोच. माझे दादा बबनराव शिंदे हे देखील राष्ट्रवादी सोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत. मी पुर्वीपासून राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे.

“कुणी कुठेही जाऊद्या. लोकहितासाठी कुणीही इतर पक्षात गेलेले नाही. तर कुणाचं काहीतरी अडकलंय, कुणाचं काहीतरी बिघडलंय.. आपल्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी लोक इतर पक्षात जात आहेत. मी काही माझी अडचण सोडवण्यासाठी आलेलो नाही तर पवारांच्या प्रेमापोटी पक्षात आलेलो आहे, असे संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -