घरताज्या घडामोडीराज्य सरकारच्या धोरणानुसार झोपड्यांचा पुनर्वसन प्रस्ताव रेल्वेने केंद्राला पाठवावा - जितेंद्र आव्हाड

राज्य सरकारच्या धोरणानुसार झोपड्यांचा पुनर्वसन प्रस्ताव रेल्वेने केंद्राला पाठवावा – जितेंद्र आव्हाड

Subscribe

या झोपड्यांना उठवायचे असेल तर त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कायद्यात बदल करावा लागेल. कारण शासनाने झोपड्या कोणत्या जागेवर आहेत याबाबत भेद केलेला नाही. २०११ पर्यंतच्या त्या झोपड्या संरक्षित असतील तर त्यात बदल करता येणार नाही.

राज्य सरकारच्या धोरणानुसार रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांचा पुनर्वसन प्रस्ताव रेल्वेने केंद्र सरकारला पाठवाला असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी असे वक्तव्य केलं आहे.

रेल्वेलगत असलेल्या झोपडपट्टीबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, राज्य शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजने नुसार पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवावा. झोपडपट्टी पुनर्विकासाला १९९५ पासून सुरूवात झाली. २०१८च्या शासन निर्णया नुसार २०११ पर्यंतच्या झोपड्या संरक्षित आहेत. या नुसार रेल्वे लगतच्या झोपड्या ज्या त्यापुर्वी उभ्या राहिल्या असतील तर त्या संरक्षित आहेत. या झोपड्यांना उठवायचे असेल तर त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कायद्यात बदल करावा लागेल. कारण शासनाने झोपड्या कोणत्या जागेवर आहेत याबाबत भेद केलेला नाही. २०११ पर्यंतच्या त्या झोपड्या संरक्षित असतील तर त्यात बदल करता येणार नाही.

- Advertisement -

राज्य शासनाचे झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरण आहे. त्यानुसारच त्यांचे पुनर्वसन केले जाते. या धोरणानुसार घरे बांधुन द्यावेत असे केंद्राला कळविण्यात यावे. रेल्वेने दुर्लक्ष केल्यामुळे तयार झालेल्या झोपड्यांची आर्थिक जबाबदारी राज्य शासन घेऊ शकत नाही. यात प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजने अंतर्गत ही जबाबदारी राज्य शासन घेणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

सुप्रिम कोर्टाच्या एका निर्णयाचा आधार घेत रेल्वे लगतच्या सर्व झोपडपट्टीवासियांना घरे रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. राज्य शासनाच्या एखाद्या योजनेनुसार या लोकांचे पुनर्वसन करण्याचे कोर्टाने निर्णय देतांना सूचविले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले होते. या बैठकीला नगरविकासचे प्रधान सचिव भुषन गगरानी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर,मध्य रेल्वे चे मुख्य अभियंता(सा) राजीव मिश्रा, पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता अमित गुप्ता, अप्पर मंदल रेल प्रबंधक अवनिश वर्मा उपस्थित होते.


हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या हजारावर, १ रुग्णाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -