घरताज्या घडामोडीमी मुख्यमंत्र्यांना भेटलोच नाही; स्पष्टीकरण देत आव्हाडांचा चर्चांना पूर्णविराम

मी मुख्यमंत्र्यांना भेटलोच नाही; स्पष्टीकरण देत आव्हाडांचा चर्चांना पूर्णविराम

Subscribe

दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतितीगृहावर जितेंद्व आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीच नाही, असे सांगत या वृत्ताचे स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी खंडण केले.

‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतितीगृहावर जितेंद्व आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीच नाही, असे सांगत या वृत्ताचे स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी खंडण केले. (NCP Jitendra Awhad Slams cm eknath shinde meet)

सह्याद्री अतितीगृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितेले की, “मी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलोच नाही. माझ्यावर कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हाच फक्त मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना भेटलोच नाही. मात्र ज्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा मी त्यांना हात जोडून विचारलं की, साहेब मी काय वाईट केलं होतं की, तुम्ही माझ्यावर कलम 354नुसार गुन्हा दाखल केला”.

- Advertisement -

पुढे आव्हाड म्हणाले की, “आज मी सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली. नगरविकास क्षेत्रासंदर्भात माझे काम असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. परंतु, मी आज मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी इथे आलेलो नाही”, असेही त्यांनी सांगितले.

क्लासलेस अर्थसंकल्प

- Advertisement -

“केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे श्रीमंतापासून ते गरीबांपर्यंत असलेले क्लास असतात, तेच मिटवले आहेत. हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, ज्या आपण क्लासलेस म्हणू शकतो. हा अर्थसंकल्प कोणासाठीच नाही. हे दोन लाख कोटींचे मोफत अन्नधान्य वाटलं. तुम्ही नोकऱ्या किती निर्माण करणार आहात. जीडीपीसंदर्भात तुम्ही काहीच बोलत नाही. ज्या पद्धतीने जीडीपीचे रेंटीग होत आहे, त्यापद्धतीने भारताचा जीडीपी वाढत नसून सारखा खाली जात आहे. त्यामुळे कोणत्याही देशाचा विकास ज्यावेळी खाली जातो, त्यावेळेला विकास कुठे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे देशातील विकासाकडे निर्मतेने बघणे गरजेचे होते. परंतु, ते बघितलेचं गेले नसल्यामुळे सर्व आशा धुळीस मिळाल्या”, अशी शब्दांत आव्हाडांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वर टीका केली.

‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


हेही वाचा – आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -