घरमहाराष्ट्रविकासकामे करताना पक्ष पाहू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

विकासकामे करताना पक्ष पाहू नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

Subscribe

विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापार्‍यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या. विकासकामे करताना पक्ष पाहू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. व्यापार्‍यांना भेटल्यानंतर ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आमच्या भागात उसाचे मोठे उत्पादन होते. सहकाराच्या माध्यमातून आम्ही अनेक साखर कारखाने खरेदी केले. राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्यातील जनतेनs मला चार वेळा मुख्यमंत्री केले. राज्य चालवायची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना सर्व राज्यांकडे बघावे लागते. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे कल जास्त असतो.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामे केलीत. विकासकामे करताना गडकरी पक्ष पाहात नाहीत. याचप्रकारे त्यांच्यासोबत काम करणार्‍या नेत्यांनी काम केले असते तर व्यापार्‍यांच्या अनेक समस्या सुटल्या असत्या, असे ते म्हणाले. पाच सहा व्यापार्‍यांचे डेलीगेशन तयार करून, यापैकी काही समस्या सोडवता येतील. १० दिवसांत संसदेचे अधिवेशन सुरू होईल. १० दिवसांत व्यापार्‍यांच्या समस्यांची नोट मिळाली, तर राज्य सरकारकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कायदा हातात घेणे योग्य नाही
अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात होणे योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणे योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणे योग्य नाही, याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले. अमरावतीत ज्यांची दुकाने फोडली गेली त्यात त्यांचा काय दोष? त्रिपुराच्या घटनेत व्यापार्‍यांचा काय दोष, असा सवालही त्यांनी केला. संपामुळे व्यापार्‍यांचे नुकसान होते. याबाबत सरकारने काही धोरणे आखणे गरजेचे असते. हिंसक घटनांमध्ये दुकानांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युनियन चालवणार्‍या लोकांनी तुटेपर्यंत ताणू नये. उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांनी याचा विचार करायला हवा, असा सल्लाही पवार यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -