घरताज्या घडामोडीNCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजित पवारांसह 37 जणांचा...

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजित पवारांसह 37 जणांचा समावेश

Subscribe

भाजपनंतर आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई : भाजपनंतर आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह 37 जणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. (NCP List of NCP star campaigners released Including 37 persons including Ajit Pawar)

लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वपक्षीय श्रेष्टींनी योग्य उमेदवारांच्या तपासाला सुरूवात केली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही तयारीला सुरूवात केली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकांसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवाजीराव अढळराव पाटील आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटानेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. भाजप आणि शिवसेनेने 40 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे.


हेही वाचा – ARVIND KEJRIWAL : मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याची मागणी फेटाळली, दिल्ली हायकोर्टाचा केजरीवालांना दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -