घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : संजय राऊत किती खोटं बोलाल; आंबेडकरांकडून संताप व्यक्त

Prakash Ambedkar : संजय राऊत किती खोटं बोलाल; आंबेडकरांकडून संताप व्यक्त

Subscribe

मुंबई : शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात दुपारी 4:30 वाजता बैठक होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरू आहे. त्यांनी जागा जाहीर केल्या आहेत तरीही चर्चा सुरू आहे. निवडणूक व्हायला वेळ आहे. आमची चर्चा निरंतर सुरू आहे, असं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश यांनी संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत किती खोटं बोलाल, असं ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. (How much will Sanjay Raut lie Expressed anger by Prakash Ambedkar)

हेही वाचा – Lok Sabha 2024 : उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी करून दाखवले, पण एकनाथ शिंदेंचे काय?

- Advertisement -

संजय राऊत किती खोटं बोलणार असं शीर्षक देत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत. सिल्व्हर ओक येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहात तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहात. हे तुमचे विचार आहेत? असा प्रश्नांचा भडीमार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे कारण?

प्रकाश आंबेडकर आमच्या विचारांचे

दरम्यान, संजय राऊत यांनी आज सकाळी असेही म्हटले होते की, देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या हे होऊ नये म्हणून आम्ही लढा देत आहोत. बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाचं रक्षण हे आमची जबाबदारी नाही, तर सर्वाधिक जबाबदारी बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. भाजपाल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल, असं पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -