घरमहाराष्ट्रभाजप राणेंना किंमत देत नाही, तर नितेश राणे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजतात;...

भाजप राणेंना किंमत देत नाही, तर नितेश राणे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजतात; अमोल कोल्हेंचं चोख प्रत्युत्तर

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्धा दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू म्हणत कुठला तो अमोल कोल्हेंनी दाढी काढली तर त्यांना कोणी ओळखणार नाही, अशी जहरी टीका नितेश राणेंनी केली होती. नितेश राणेंच्या याच टीकेला आज खासदार अमोल कोल्हेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहेत ते? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? असे अनेक सवाल कोल्हे यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत. बोलताना त्यांचे संस्कार प्रकट होत असता याचा विचार करा, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला आहे. यावेळी नितेश राणेंचा प्रत्यक्ष उल्लेख करणं टाळत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा खरमरीत सवाल केला आहे.कला क्षेत्र हे माझं उत्पन्नाचं साधन आहे, हे मी उजळ माथ्याने सांगतो, असं राणेंनी सांगावं असं खुलं आव्हानतं कोल्हे यांनी नितेश राणेंना दिलं आहे. यापुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे . जर माईक वर बोलायचं असेल तर मला ही बोलता येत. पण मी जे करतो हे त्यांना जमत का? इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही, अस स्पष्ट शब्दात कोल्हे यांनी नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

राणेंनी जर काही योगदान दिले का? क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, इतकंच काय मी सिंधुदुर्ग मध्ये नक्की कार्यक्रमाचे प्रयोग करेल, ते याची देही याची डोळा त्यांनी पाहावं असेही अमोल कोल्हे यांना ठणकावून सांगितलं आहे.


नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -