घरमहाराष्ट्रविधानसभेला राष्ट्रवादीने तिकिट ऑफर केलं होतं पण मी नाकारलं - एकनाथ खडसे

विधानसभेला राष्ट्रवादीने तिकिट ऑफर केलं होतं पण मी नाकारलं – एकनाथ खडसे

Subscribe

राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदा मुक्ताईनगरमध्ये आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. दरम्यान, पुन्हा एकदा खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिट ऑफर केलं होतं, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

विधानसभेला भाजपने माझं तिकिट कापलं. मी रोहिणी ताईंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. परंतु, जाणीवपूर्वक त्यांना तिकिट देत त्यांना निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपमधील काही गद्दारांनी काम केलं असा पुन्हा एकदा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. पक्षांतर करा असं मला माझे कार्यकर्ते कायमच सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे तो तुम्ही सहन करु नका असं मला कार्यकर्ते सातत्याने सांगत होते. मात्र मी चाळीस वर्षे पक्षासाठी काम केलं त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण जाणूनबुजून मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं. विधानसभेला भाजपने माझं तिकिट कापलं. त्यानंतर मला राष्ट्रवादीने दोन दिवस पक्षात येण्याची विनंती केली होती. आम्ही तुम्हाला तिकिट देतो. मात्र त्यावेळी मी ती ऑफर नाकारली अशी माहिती खडसेंनी दिली.

- Advertisement -

रोहिणी खडसे यांना तिकिट देणं ही भाजपची खेळी होती. रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी भाजपमधील कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यासंदर्भातील फोटो, ऑडिओ कॅसेट आणि सीडी हे सगळं मी दहा महिन्यांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलं. मात्र, कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याचाच अर्थ त्यांच्यामागे कोणीतरी उभं होतं हे स्पष्ट आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -