घरदेश-विदेशनवीन चिन्ह घ्यायचं, लोकं ते स्वीकारतात; निकालानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

नवीन चिन्ह घ्यायचं, लोकं ते स्वीकारतात; निकालानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Subscribe

केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आज एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनके प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रियी दिली आहे. एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही, तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार काही परिणाम होत नाही, लोक ते चिन्ह स्वीकारतात, असा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

शरद पवार म्हणाले की, एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही, तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार काही परिणाम होत नाही. काँग्रसमध्ये एकदा इंदिरा गांधी हा वाद झाला, त्यावेळी काँग्रेसचं चिन्ह गेलं, काँग्रेसने हात हे चिन्ह घेतलं आणि लोकांनी ते मान्य केलं, आता उद्धव ठाकरेंनी नवीन चिन्ह घेतलं तर ते लोक मान्य करतील, फार परिणाम होत नाही. महिना पंधरा दिवस चर्चा होईल.


एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर अजित पवार म्हणाले, अनपेक्षित निकाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -