घरमहाराष्ट्रआणि डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले की

आणि डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले की

Subscribe

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली मात्र मतमोजणी सुरू होण्याअगोदरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या फोटोचे बॅनर पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलाच्या बाजूलाच असणाऱ्या पुलावर लागले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून विजयाच्या अगोदरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. अमोल कोल्हे यांना खासदार संबोधण्यात आले असल्याचे फलक झळकत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासदारकीची एक चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुलामध्ये शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना उमेदवार विजयी न होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. कोल्हे यांना खासदार म्हणून जाहीर केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र निकालानंतर कोण गुलाल उधळणार आणि कोणाला धुळ चारणार हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.

- Advertisement -

अमोल कोल्हे यांची थेट लढत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा शिरूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -