घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत तर्क वितर्क केले जात होते. पण पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कर्नाटकमध्ये ४६ जागांवर निवडणुका लढणार आहोत. आमचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याकडून कर्नाटकात पाच ते सहा सभा घेणार आहेत, असं आर हरी म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. २३ वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भाजपविरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तिन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने दिलेला हा मोठा दणका आहे.

- Advertisement -

याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षांकडून खुलासा मागवत या पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाचा आढावा घेतला होता, तर दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक अटी आहेत. यापैकी कुठल्याही तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाने २ टक्के जागा जिंकणे, लोकसभेच्या ४ जागांसोबतच लोकसभेतील किमान ६ टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत ४ किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान ६ टक्के मते मिळवणे, ४ किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असणे आवश्यक आहे. यापैकी कुठलीही एक अट पूर्ण करणार्‍या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.


हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -