घरदेश-विदेशनीट परिक्षेचा निकाल जाहीर; नलिन खंडेलवाल देशात पहिला

नीट परिक्षेचा निकाल जाहीर; नलिन खंडेलवाल देशात पहिला

Subscribe

सार्थक भटने महाराष्ट्रात पहिला आणि देशामध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रामध्ये साईराज माने याने दुसरा आणि सिध्दार्थ दाते याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्स्थानचा नलिन खंडेलवाल हा देशामध्ये पहिला आला असून त्याला ९९.९९ टक्के आणि ७०१ गुण मिळाले आहेत. तर सार्थक भटने महाराष्ट्रात पहिला आणि देशामध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रामध्ये साईराज माने याने दुसरा आणि सिध्दार्थ दाते याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या ५० टॉपरमध्ये सार्थक भट, साईराज माने आणि सिध्दार्थ दाते या तिघांचा समावेश आहे. मुलींमध्ये तेलंगणाची माधुरी रेड्डीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तिने ६९५ गुण मिळवले. तर महाराष्ट्रामध्ये दिशा अगरवाल हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेस महाराष्ट्रातून २ लाख १६ हजार १७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात ८१ हजार १७१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशभरातून नीट परीक्षेसाठी १४ लाख १० हजार ७५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७ लाख ९७ हजार ४२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. २०१८ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५६. २७ एवढी होती. यंदा हा टक्का ५६.५० पर्यंत वाढला आहे.

- Advertisement -

नीट २०१९ चे टॉपर्स –
१ – नलिन खंडेलवाल – ७०१ – राजस्थान
२ – भाविक बंसल – ७०० – दिल्ली
३ – अक्षत कौशिक – ७०० – उत्तर प्रदेश
४ – स्वास्तिक भाटिया – ६९६ – हरियाणा
५ – अनंत जैन – ६९५ – उत्तर प्रदेश
६ – भट सार्थक राघवेंद्र – ६९५ – महाराष्ट्र
७ – माधुरी रेड्डी जी – ६९५ – तेलंगाना
८ – ध्रुव कुशवाहा – ६९५ – उत्तर प्रदेश
९ – मिहिर राय – ६९५ – दिल्ली
१० – राघव दुबे – ६९१ – मध्य प्रदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -