घरमनोरंजनसलमान आजही वापरतो कतरिनाने दिलेले 'ते' गिफ्ट

सलमान आजही वापरतो कतरिनाने दिलेले ‘ते’ गिफ्ट

Subscribe

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान अभिनीत 'भारत' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात स्टायलिश दिसणारा सलमान खान वैयक्तिक आयुष्यात स्टाइलला फारसे महत्व देत नसल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडमधील जवळपास सर्वच नट-नट्या त्यांच्या युनिक स्टाइल स्टेटमेंटसाठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असतात. एवढेच नाही तर आवडत्या अभिनेता, अभिनेत्रीने केलेल्या फॅशनचे अनुकरण करायलाही प्रेक्षक, चाहते विसरत नाही. अभिनेता सलमान खानचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकांप्रमाणे फॅशन करायला त्याचे चाहते विसरत नाहीत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान खान फॅशनच्या बाबतीत थोडासा मागेच आहे. सलमान खानने स्वतः या बाबतचा खुलासा एका इंग्रजी दैनिकाकडे केला आहे.

मागील काही वर्षांपासून अभिनेता सलमान खानने स्वतःची फॅशन स्टाइल निर्माण केली आहे. सलमान खानच्या हातातील ब्रेसलेट, हेअरस्टाइल, सनग्लासेस तसेच त्याच्या कपड्यांची निवड याबाबतीत सलमान खानने आपली स्टाइल कायम ठेवली आहे. असे असले तरी अभिनेता सलमान खानने चित्रपटात किंवा व्यक्तीगत आयुष्यात केलेली फॅशन त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहे.

- Advertisement -

‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला

ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान अभिनीत ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हा नेहमीप्रमाणेच या चित्रपटाला त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

Thanx everyone for such warm wishes!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

कतरिनाने भेट म्हणून दिला बेल्ट

एका इंग्रजी दैनिकाने अभिनेता सलमान खान याला त्याच्या स्टाइल आयकॉन असण्यावर प्रश्न केला. या प्रश्नाला अभिनेता सलमान खानने खूपच प्रामाणिक उत्तर दिले. अभिनेता सलमान खान म्हणाला की, मागील ५ वर्षांपासून मी एकच काळ्या रंगाचं टी-शर्ट, जीन्स आणि कतरिनाने मला भेट म्हणून दिलेला बेल्ट मी वापरत आहे.

सलमान वापरतो ५ वर्ष जुने शूज

दैनिकाच्या एंटरटेनमेन्ट पोर्टलला सलमान खानने सांगितले की, महिलांनी कोणत्या समारोहात, पार्टीमध्ये कोणते कपडे घातले आहेत, याबाबत तुम्ही महिलांच्या गटात चर्चा करता. पण माझ्याबाबतीत हीच चर्चा करायची असल्यास तुम्हाला ही चर्चा सर्वत्र करावी लागेल. आज मी वापरत असलेले शूज ५ वर्ष जुने आहेत. आजही तुम्ही मला त्याच काळं टी-शर्ट आणि जीन्सच्या वेशात पहाल. ५०० रूपये किंमतीचे हे टी-शर्ट वर्षोन्वर्षे मी वापरत आहे. शेवटी ते टी-शर्ट आहे. कपडे धुवून तुम्ही पुन्हा ते कपडे परिधान करता. यात काय? असा प्रश्न करत सलमान खानने त्याचे बेल्ट २०, २० वर्ष चालतात असेही सांगितले. पुढे जावून त्याने हेही सांगितले की, कतरिनाने भेट म्हणून दिलेला बेल्ट तो आजही वापरतो.

चाहत्यांनो, फॅशन करा. पण खिशाला कात्री न लावता. सर्वांप्रमाणेच मलाही नवनवीन कपडे परिधान करायला आवडतात. मात्र या गोष्टींविषयी मी फारसा उत्सुक नसतो. तुम्ही मला चित्रपटात ज्या फॅन्सी गोष्टी वापरताना पाहता, ती त्या कथानकाची, पात्राची गरज असते, म्हणून मी चित्रपटात फॅशनेबल दिसतो.
सलमान खान, अभिनेता

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -