घरमहाराष्ट्रनरडवे इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

नरडवे इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

Subscribe

या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे जनरल मॅनेजर मुरलीधर नायकर व्यासपीठावर उपस्थित होते

मुंबई : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नरडवे इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी स्नेहमेळावा मुंबईत नुकताच उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील परळ येथील दामोदर नाट्यगृहाच्या परिसरातील सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलच्या एसी सभागृहात नरडवे इंग्लिश हायस्कूलच्या आजी माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवली. या स्नेहमेळाव्यासाठी १९६३ ते २०२२ पर्यंतच्या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र गोळा झाले होते.

या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे जनरल मॅनेजर मुरलीधर नायकर व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर या मेळाव्यात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी मुख्याध्यापक मनोहर काजरेकर, नरडवे हायस्कूल शालेय समितीचे चेयरमन दत्तात्रय मुंडले, उद्योजक बी. डी. सावंत, अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ मुंबईचे अध्यक्ष जे. वाय. सावंत, सेक्रेटरी विजय सावंत, कार्यध्यक्ष जी. एन. सावंत, विठोबा राणे, सेवानिवृत्त आयकर ऑफीसर तसेच सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ सदस्य, नरडवे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

सुरुवातीला दिवंगताना श्रद्धांजली वाहून वंदन करण्यात आले. तद्नंतर दीपप्रज्वलन करून आणि इष्ट देवतांना पुष्पहार प्रदान करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली. ईशस्तवन आणि स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला विजय सावंत यांनी अ. न. ग्रा. संघाची ध्येय, उद्दिष्ट व आगामी वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. तसेच नरडवे हायस्कूलच्या बहुउद्देशीय सभागृह व वर्ग खोल्यांचे बांधकामासाठी देणग्या दिलेल्या सर्वांचे यावेळी कौतुक व सत्कार करण्यात आले. या प्रस्थावित इमारत बांधण्यामागची पार्श्वभूमी व भविष्यातील गरज विशद करण्यात आली. या हायस्कूलच्या उभारणीमुळे या गावाच्या पंचक्रोशीत झालेला शैक्षणिक बदलांमुळे लोकांची झालेली प्रगती व उन्नती याबाबत चर्चा करण्यात आली.

मुरलीधर नायकर यांनी आपल्या छोट्याशा भाषणात जीवनात शाळेचे महत्त्व सांगून माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी सहकार्य करण्यासंबधी आवाहन केले. आपल्या शाळेला जीवनात कधीही विसरू नका, असा मोलाचा भावनिक सल्ला दिला. तर प्रदीप गंधे यांनी आपण या कार्यक्रमातील माजी विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले व आपल्या वतीने या शाळेसाठी मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही पाहुण्यांनी नरडवे गावाला व नरडवे हायस्कूलला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले. तसेच बी.डी. सावंत यांनी सीएसआरच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळवून त्याच्या सहाय्याने शाळेचा तसाच गावाचा कायापालट करण्याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रूपाली संदीप सावंत यांनी तंत्रज्ञान विषयक शिक्षणाचे महत्त्व सांगून शाळेचे महत्त्व पटवून दिले. तर जे. वाय. सावंत यांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या या महान कार्यात आपण सहभागी व्हा, असे कळकळीचे आवाहन केले.

- Advertisement -

यासमयी देणगीदारांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांना शाळेचा फोटो असलेले सुंदर असे सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृष्णा म्हसकर आणि गणेश रावराणे या माजी विद्यार्थ्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -