घरठाणेकला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम यांचं निधन

कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम यांचं निधन

Subscribe

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय पी. सावळाराम यांचे नुकतेच (29 नोव्हेंबर रोजी) अल्पशा  आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. जनकवी व ठाणे महापालिकेचे दिवंगत नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या पश्चात भगिनी डॉ. कल्पना पाठारे, पत्नी गीता,मुलगा ओंकार पाटील, मुलगी संपदा पाटील, सुन सुवर्णा, पत्नी गीता आणि नात असा परिवार आहे.

पाटील हे खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. ते जनकवी पी. सावळाराम कला समितीचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. यंदाही या पुरस्कार सोहळ्याची तयारीत ते व्यस्त असतांनाच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  महाराष्ट्रातर्फे लोकसभा प्रवास योजनेला आजपासून सुरुवात, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -