घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात आठवडा बाजार बंद, रात्रीचा जनता कर्फ्यू लागू

सिंधुदुर्गात आठवडा बाजार बंद, रात्रीचा जनता कर्फ्यू लागू

Subscribe

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क न वापरणार्‍यांना आता 200 ऐवजी 500 रुपयांंचा दंड आकारला जाणार आहे. तसेच लोकांनी पुढचे आठ दिवस स्वतःहून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये (जनता कर्फ्यू) अन्यथा आठ दिवसांनंतर संचारबंदी लागू केली जाईल, असा इशारा देतानाच जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच परवानगीशिवाय कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत,असेही ते म्हणाले.

उदय सामंत यांनी मंत्रालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोनाबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

- Advertisement -

सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी इतर जिल्ह्यात तो वाढत आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अगोदरच उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत जनता गंभीर नसल्याने मास्क न वापरणार्‍यांवर आता 200 ऐवजी 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लोकांनी स्वतःहून घराबाहेर पडू नये. मात्र, लोकांनी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळला नाहीतर रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -