घरमहाराष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नीचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नीचे निधन

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ समाजसेविका निर्मलाताई पुरंदरे यांचे आज निधन झाले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी ज्येष्ठ समाजसेविका निर्मलाताई पुरंदरे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पाश्चात पती, दोन मुले प्रसाद, अमृत, मुलगी माधुरी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका व लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होतं.

निर्मलाताई पुरंदरे यांच्याविषयी

ज्येष्ठ समाजसेविका निर्मलाताई पुरंदरे यांचा जन्म ८ जानेवारी १९३३ रोजी बडोद्यात झाला. १९५७ साली त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीतून कामाला सुरुवात केली होती. पुरंदरे या प्रसिद्ध माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. . माजगावकर यांच्या भगिनी होत्या. या साप्ताहिकाच्या संपादन विभागात त्यांनी २० वर्ष काम केले होते. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या वनस्थळीया संस्थेच्या त्या संस्थापिका होत्या. पुरंदरे यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी मागील ५० वर्षांपासून काम केले. वनस्थळीमुळे भागातील अल्पशिक्षीत महिलांच्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षणाची त्यांनी सोय केली. त्यातून राज्यभर हजारो सेविका आणि बालवाड्यांचे जाळे देखील विणले.

- Advertisement -

खेडेगावातली पहिली बालवाडी केली स्थापन

निर्मलाताई पुरंदरे यांनी फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनाची स्थापना केली असून खेडेगावातली पहिली बालवाडी त्यांनी स्थापन केली. तसेच शाळाबाह्य तरुणांसाठी त्यांनी सुतारकाम, प्लम्बिंग सारख्या कामांच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन देखील केले. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्टया संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठी त्या अनेक उपक्रमाचे आयोजन करत असत. त्यांना २४ व्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -