घरताज्या घडामोडीहिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर.., ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर...

हिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर.., ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर नितेश राणेंचा संताप

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात काही पोलीस अधिकारी संबंधितांना मदत करतात असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं असून हिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर आम्ही सोडणार नाही अशी सरकारची भूमिका आहे, असं नितेश राणे म्हणाले.

कोल्हापूरमध्ये १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असणारी अल्पवयीन मुलगी सापडली आहे. तसेच पोलिसांनी त्या मुलाचाही शोध घेतला आहे. या दोघांनाही पोलिसांनी कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी नितेश राणेंनी आंदोलन देखील केलं होतं. परंतु जी तरूणी १८ दिवसांपासून गायब होती. ती तरूणी जन आंदोलन केल्यानंतर काही तासांत घरी कशी येऊ शकते?, असा सवाल करत राणेंनी पोलिसांवर शंका उपस्थित केली. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं असून हिंदू समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अशा पद्धतीने टार्गेट केलं तर आम्ही सोडणार नाही अशी सरकारची भूमिका आहे, असंही राणे म्हणाले.

- Advertisement -

हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जातं, यासाठी रेट कार्ड तयार करण्यात आलं आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आलं. तसेच तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान, येणाऱ्या अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचा अभ्यास सुरू असून लवकरच कायदा येईल आणि अशा घटना थांबतील, असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भिडे ही समाजातली विकृती.., नाना पटोलेंचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -