घरमहाराष्ट्र५० हजार कोटींचा सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे होणार; गडकरींची घोषणा

५० हजार कोटींचा सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे होणार; गडकरींची घोषणा

Subscribe

केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेची घोषणा केली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज ४ हजार ७५ कोटींच्या २५ महामार्गाचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात हा एक्सप्रेस वे एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्राफिक येतो मुंबईत. मुंबईवरुन सोलापूर, कोल्हापूरवरुन तो दक्षिणेत जातो. त्यामुळे कोल्हापूरचंही ट्राफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सूरतवरुन वळेल, असं गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हा रस्ता हा अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असणार आहे. परवा मी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर होतो. त्यावर मी जेव्हा ट्रायल घेतली तेव्हा गाडी १४० किमी प्रतितास गाडी चालली. नंतर १७० किमी प्रति तास वेगाने गाडी चालली तेव्हा पोटातलं पाणीही हललं नाही. आपल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा रुंदीला तीन पट मोठा आहे. आता ७० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे सगळा ट्राफिक आता सूरतवरुन वळेल, असं गडकरी म्हणाले.


हेही वाचा – राज्यात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे अन् साखर कारखान्यांनी पेट्रोल पंप सुरू करावा – गडकरी

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -