घरताज्या घडामोडीमहापालिकेला ५८० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त

महापालिकेला ५८० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त

Subscribe

कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरीता महापालिकेने नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानूसार महापाालिकेला ५८० मशीन प्राप्त झाले आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या अति गंभीर रूग्णांना ऑक्सिजनची गरज पडते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठया प्रमाणावर ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात आला. त्यामुळे नगरसेवकांनी आपल्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. सद्यस्थितीत इतर विकास कामे सुरू नसल्याने व आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याविषयीची अत्यावश्यक कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. नगरसेवक निधीतून या मशीनची खरेदी करता येणे शक्य असल्याने आयुक्तांनी नगरसेवकांना प्रत्येकी पाच मशीन नगरसेवक निधीतून देण्यास संमती दर्शवली. त्यानुसार या मशीनची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात साडेतीनशे मशीन आले होते. त्यापैकी ३०५ मशीनचे वाटप नगरसेवकांना करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा २३० मशीन महापालिकेला प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यातील २७५ मशील महापालिकेकडे शिल्लक आहेत. पहिल्या टप्प्यात नगरसेवकांना प्रत्येकी दोन ते तीन मशीनचे वाटप करण्यात आले होते. आता पुन्हा मशीनचे वाटप करण्यात येणार असून ६०० मशीनची मागणी करण्यात आली आहे. आणखी ६०० मशीन महापालिकेला प्राप्त होणार असून, नगरसेवकांना ठरल्याप्रमाणे या मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -