घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनवोदय विद्यालयात कोरोनाचा विस्फोट

नवोदय विद्यालयात कोरोनाचा विस्फोट

Subscribe

२० विद्यार्थ्यांना बाधा, ५० विद्यार्थ्यांचे अहवाल प्रलंबित

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांचा आकडा दररोज वाढतोच आहे. सोमवारी पुन्हा २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता ७० वर गेला आहे. आणखी ५० विद्यार्थ्यांचे अहवाल प्रलंबित असून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवोदय विद्यालयात रविवारपर्यंत ३१ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या शाळेत ४०२ विद्यार्थी शिक्षण घेतात. पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील २० विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वॅबचे नमुने ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विद्यालयातील बाधितांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे. नवोदय विद्यालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -