घरमहाराष्ट्ररश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट

रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट

Subscribe

भाजपच्या आयटी सेल प्रमुखांची चौकशी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख जितेश गजारिया यांची मुंबई सायबर सेल पोलिसांनी चौकशी करून जबानी नोंदवून घेतली. पाच तासांच्या चौकशीनंतर जितेश यांना सोडून देण्यात आले. या चौकशीचा तपशील मात्र सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

जितेश गजारिया हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध काही आक्षेपार्ह ट्विट केले होते. रश्मी ठाकरे यांच्या ट्विटनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्याची मुंबई सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत जितेश यांच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.

- Advertisement -

या नोटीसनंतर गुरुवारी दुपारी दोन वाजता जितेश हे बीकेसी येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनी केलेल्या ट्विटबाबत त्यांची कसून चौकशी केल्यानंतर जबानी नोंदविण्यात आली. तब्बल पाच तास ही चौकशी सुरू होती. रश्मी ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरोधात ट्विट करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याबाबत त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. पाच तासांच्या चौकशीनंतर अखेर त्यांना सोडून देण्यात आले.

भाजपच्या ट्विटवर विद्या चव्हण, मनिषा कायंदे यांचे टीकास्त्र
भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. तिला बिहारचे मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी केली.

- Advertisement -

कसे ट्रोलिंग करावे एखाद्याला कसे आयुष्यातून उठवावे याचा कारखाना म्हणजे भाजप आहे. भाजपला काही काम नाही. ही शिकलेली माणसे आहेत. विकृत मनोवृत्तीची ही माणसे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी टीका शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -