घरताज्या घडामोडीआषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४७०० विशेष गाड्या धावणार

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४७०० विशेष गाड्या धावणार

Subscribe

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यासांठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा केली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदाही एसटी महामंडळाने बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यासांठी एसटी महामंडळाकडून (MSRTC) विशेष गाड्यांची सुविधा केली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदाही एसटी महामंडळाने बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी बुधवारी घोषणा केली.

येत्या ६ जुलै ते १४ जुलै या कालावधीत विशेष गाड्या (Special Service) सोडण्यात येणार आहेत. शिवाय, वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी ८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आषाढी एकादशीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन अनिल परब यांनी केले.

- Advertisement -

दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप पणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एस महामंडळावर आहे. म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४ हजार ७०० गाड्या सोडण्यात येत आहेत.

विशेष गाड्यांचे नियोजन –

- Advertisement -
  • औरंगाबाद -१२००
  • मुंबई – ५००
  • नागपूर – १००
  • पुणे – १२००
  • नाशिक – १०००
  • अमरावती – ७००

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्याच्या विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी, यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

याकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

  • चंद्रभागा बसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
  • भिमा यात्रा देगाव – औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
  • विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
  • पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

हेही वाचा – ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्राला सादर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -