घरताज्या घडामोडी'मध्य प्रदेश, राजस्थान गेलं, आता महाराष्ट्रातले ठाकरे सरकारही जाणार'

‘मध्य प्रदेश, राजस्थान गेलं, आता महाराष्ट्रातले ठाकरे सरकारही जाणार’

Subscribe

“राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडण्याचा सचिन पायलट यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. राजस्थानच्या विकासासाठी सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभे राहावे”, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये जसे काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले. राजस्थानमध्ये देखील सरकार पडण्याच्या मार्गावर आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार देखील लवकरच जाईल, असेही आठवले म्हणाले आहेत.

“राजस्थानमध्ये बहुमतासाठी १०१ आमदारांची गरज आहे. सचिन पायलट यांनी त्यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी जर ३० आमदारांचा पाठिंबा मिळविला तर भाजपकडे ७८ आमदारांचे संख्याबळ असून सचिन पायलट यांच्या ३० आमदारांमुळे भाजप १०८ आमदारांच्या बळावर राजस्थानात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जसे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कामलनाथ यांचे सरकार जाऊन भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांचे सरकार आले तसेच राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार येईल. राजस्थान नंतर महाराष्ट्रातही सत्तांतर घडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन महारष्ट्रात भाजपचे सरकार येऊ शकते, अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सन्मान होत नव्हता. अपमान होत असल्याने सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -