घरताज्या घडामोडीकरोना अपडेट - औरंगाबादमध्येही करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

करोना अपडेट – औरंगाबादमध्येही करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Subscribe

जगभरात करोना व्हायरसची दहशत पसरली आहे. राज्यात करोना व्हायरसचे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबाद येथील ५९ वर्षीय महिला करोना बाधित आढळली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ३२वर गेली आहे. या करोना बाधित महिलेने रशिया आणि कझाकिस्तान या ठिकाणी प्रवास केला होता. सध्या या महिलेवर धूत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या १ लाख ४५ हजार करोनाबाधित रुग्ण जगभरात आढळले असून त्यापैकी ५ हजार करोनाबाधित लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील करोनाबाधितांची संख्या १००वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ३२वर पोहचला आहे. पुण्यात १५, मुंबईत पाच, नागपूरमध्ये चार, यवतमाळमध्ये दोन, नवी मुंबईत दोन, ठाणे आणि कल्याण प्रत्येकी एक-एक, अहमदनगर एक आणि औरंगाबाद मध्येही एक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. तसंच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मॉल्सही बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

- Advertisement -

अशी घ्या काळजी

  • आपण योग्य ती स्वच्छता राखवी.
  • कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे.
  • कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयात जाण्यापूर्वी चेहऱ्यावर मास्क लावणे.
  • खोकला, शिंक आल्यास तोंडावर, नाकावर रूमाल धरणे.
  • पाळीव प्राण्यांशी संपर्क मर्यादित ठेवणे.
  • इतरांच्या आसपास असताना चेहऱ्यावर मास्क लावावे.
  • मास्क वापरल्याने तोंडातून होणार संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकते.

हेही वाचा – करोना चाचणीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपोर्ट आला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -