घरमहाराष्ट्रनाशिकआंतरराष्ट्रीय योगदिनी नाशिककरांना लाईव्ह सहभागाची संधी

आंतरराष्ट्रीय योगदिनी नाशिककरांना लाईव्ह सहभागाची संधी

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मविप्र संस्थेचे आवाहन

नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे के. एस. के. डब्ल्यू. महाविद्यालय सिडको नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कॉमन योगा प्रोटॉकल कार्यक्रम घेण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी नाशिककरांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवाहन केले आहे की, आपल्या परिवारासह सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योगा करावा, तसेच दिलेल्या झूम आयडी व पासवर्डद्वारे सकाळी ६.४५ वाजता जॉईन व्हावे. जेणेकरून नाशिककरांकडून आरोग्य जागर केला जाऊन या योगदिनी करोना संकट काळातही योगसाधना शक्य होईल, असेही नाईक यांनी सांगितले आहे. दरम्यान, सहभागी होणार्‍या प्रत्येकाला ई-सर्टिफिकेटदेखील नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणार आहे.

- Advertisement -

असे होता येणार सहभागी

https://us02web.zoom.us/j/86499287861?pwd=cE8xdTVkWitvTlNrN0lGdUdjd1dzZz09
या लिंकचा वापर करून मीटिंग आयडी (86499287861) आणि पासवर्ड (893151) टाकून नाशिककरांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -