घरदेश-विदेशचुकीच्या पद्धतीने जिंकणे अयोग्य; विरोधकांचं ठरलं, निवडणूक आयोगाला 'या' मुद्द्यावरुन घेरणार

चुकीच्या पद्धतीने जिंकणे अयोग्य; विरोधकांचं ठरलं, निवडणूक आयोगाला ‘या’ मुद्द्यावरुन घेरणार

Subscribe

मुंबईः हार, जीत तर होतच असते. पण चुकीच्या पद्धतीने जिंकणे अयोग्य आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारणार आहेत. प्रश्नांची समाधानकारकर उत्तरे नाही मिळाली तर पुढे काय करावे याचा निर्णय घेतला जाईल, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्व विरोध पक्ष नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी ईव्हीएमसंदर्भात तक्रार केली आहे. मात्र त्यावर काहीही तोडगा काढला गेला नाही. मशीन खराब झालं की भाजपलाच मत जातं, असा आरोप आहे. त्यामुळेच सर्व विरोधक निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारणार आहेत. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाही मिळाली तर पुढे काय करावे याचा निर्णय घेतला जाईल.

- Advertisement -

जगातल्या कोणत्याही देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. मग आपल्याच देशात का याचा वापर केला जातोय. या मशीनमध्ये फेरफार होते. हा विरोधी पक्षाचा आरोप नाही तर सर्वसामान्यांची हीच भावना आहे. आपला देश लोकशाही प्रधान आहे. राज्य घटनेवर आपला कारभार चालतो. त्याच राज्य घटनेने एका नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. जर यातच फेरफार होत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. परिणामी आम्ही निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमसंदर्भात प्रश्न विचारणार आहोत. त्याचे लेखी उत्तर आम्ही मागणार आहोत. समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पुढची दिशा ठरवली जाईल, असे ज्येष्ठ वकील सिब्बल यांनी स्पष्ट केले.

याचा अर्थ तुम्हाला ईव्हीएमवर शंका आहे का?, असा सवाल माध्यमांनी केला. आम्हाला शंका नाही. पण आम्हाला निवडणूक आयोगाकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

माजी मंत्री व कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग म्हणाले, रिमोट व्होटींगला सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. मशीनमध्ये दोष आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -