घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंपामुळे पंचनाम्यांना ब्रेक; शेतकरी तीहेरी संकटात

संपामुळे पंचनाम्यांना ब्रेक; शेतकरी तीहेरी संकटात

Subscribe

नाशिक : सरकारी कर्मचार्‍यांचा संपाचा फटका अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना बसल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरयांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली असली तरी महसूल कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर असल्याने शेतकर्‍यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्हयात अवकाळी पावसाने नुकसान झाले असून अवकाळीने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. अद्यापही नुकसानीचे पंचनामे असून कृषी विभागाने नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेतला आहे. दुसरीकडे महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले असून, शेतकरी आता वार्‍यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एकीकडे अस्मानी संकट दुसरीकडे शेतमालाचे भाव कोसळले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारी मदत हाच एक आधार उरला आहे. त्यासाठी योग्य वेळी तसेच वेळेत पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यावरच नुकसानीचे मोजमान होऊन त्या आधारे शेतकऱ्याला सरकारी मदत मिळू शकेल. मात्र, शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने नुकसानीचे पंचनामे थांबले आहेत. यामुळे आता शेतकरी तीहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

किती झाले नुकसान 

नुकसानग्रस्त गावे : १९१
नुकसानग्रस्त शेतकरी : २७९८
एकूण नुकसान : २६८५ हेक्टर

पिकनिहाय नुकसान
  • कांदा : ६१.५ हेक्टर
  • गहू : १८०३.३ हेक्टर 
  • टोमॅटो : ३.५ हेक्टर 
  • भाजीपाला : ३७.५ हेक्टर 
  • द्राक्षे : ७७७ हेक्टर 
  • आंबा : २.८ हेक्टर  
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -