घरताज्या घडामोडीजिल्ह्यात येताना नीट अभ्यास करून येत जावे, पंकजा मुंडेंचं अजित पवारांना उत्तर

जिल्ह्यात येताना नीट अभ्यास करून येत जावे, पंकजा मुंडेंचं अजित पवारांना उत्तर

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर होते. केज तालुक्यात केलेल्या भाषणामध्ये अजित पवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना जिल्ह्यात येताना जरा नीट अभ्यास करुन येत जावे, असा पलटवार पंकजा मुंडे यांनी केला आहे. जिल्ह्यात आल्यावर अजित पवार ऊस शेतकऱ्यांना अनुदान देतील, मदत जाहीर करतील असे वाटत होते, परंतु तसे काही झाले नाही. शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा घोर निराशा पडली आहे. जे बोलता ते करून दाखवा फक्त गप्पा मारु नका अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अंबाजोगाई सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात आल्यावर चांगले काही बोलतील अशी आशा होती. परंतु त्यांच्यासोबत व्यासपीठावर सुतगिरणी बुडवणारे होते. त्याबद्दल बोलतील असे वाटलं होते. परंतु तसं काही झाले नाही. जिल्ह्यातील रस्त्यांवरुन खासदारांवर टीका केली परंतु अजित पवारांना हे माहिती नाही की, ११ राष्ट्रीय महामार्ग, अनेक छोटे-मोठे रस्ते आणले आहेत. जे तुमच्या काळात झाले नाही. तुमच्या बारामतीचा रस्ताही केंद्राच्या निधीमधून झाला असल्याचा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे. तसचे नीट अभ्यास करुन जिल्ह्यात येत जा असा पलटवार पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर केला आहे.

- Advertisement -

भाजप मुठभर लोकांचा पक्ष आहे. शेतकरी मजुरांचा नाही अशी टीका पूर्वी काँग्रेसकडून व्हायची परंतु भाजप शेतकऱ्यांसाठी खरा काम करणारा पक्ष आहे. कर्जमाफीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाची आठवण नेहमी येते. भाजपकडून शेतकऱ्यांसाठी कामे करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे काम केले आहे. आपल्या भागाचे मागासलेपण घालवायचे असेल तर शेती आणि शेतीवर आधारीत उद्योग करायला पाहिजेत. तसेच शेतीला कमी दर्जा देणं सोडून दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

अजित पवार काय म्हणाले होते?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार केज तालुक्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर वैद्यनाथ कारखान्यावरुन टीका केली. दिवंगत लोकनेथे गोपीनाथ मुंडेंच्या काळात जो वैद्यनाथ कारखाना उभारण्यात आला त्याची आता काय अवस्था झाली आहे. सुरुवातीला कारखाना चांगला चालत होता. कारखाना चालवायला कर्तृत्व लागते, येड्या गबाळ्याचे काम नाही अशी टीका अजित पवारांनी पंकजा मुंडेंचे नाव न घेता केली आहे. तसेच बापजाद्यांनी काढून दिलेल्या संस्था नीट चालवायला शिका असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कायदा हातात घेतल्यास सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही, अनिल परबांचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -