घरताज्या घडामोडीबाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तुम्ही अन् तुमच्या कार्यकर्त्यांनी केला, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तुम्ही अन् तुमच्या कार्यकर्त्यांनी केला, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Subscribe

तुम्ही कुठे पदर पसरुन निधी आणण्याची गरज बीड जिल्ह्याला लागलीच नाही. उलट हा जिल्हा सांगायचा जिंतूरला हे द्या परभणीला ते द्या पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते देखील सांगायचे माझ्या मित्राचे गाव आहे त्यांना थोडा निधी द्या असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला काय दिले याचा हिशोब करण्याची गरज नाही तर पालकमंत्र्यांनी राज्याला काय दिले याचा हिशोब करायची गरज आहे. जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. माफियाराज सुरु असून लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याचे काम सुरु असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायत इमारतीचा आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुमच्या बीड जिल्ह्याला पहिल्या ४ मधल्या मंत्रिपदाची सवय आहे. तुमचा नंबर ३२ वा आहे. जे आहे ते बोललो आम्ही काही खिजवले नाही. मी औकाद काढली का मी ताकद म्हणले आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काय आहे? असा सवाल करत पंकजा मुंडेंनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते करतात असा आरोप केला आहे. खोटा अॅट्रॉसिटी करतात कायदा वापरतात पोलिसांना घरच्या कामाला ठेवल्यासारखे वापरुन घेतात. तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेचे अपमान करताय बाबासाहेब आंबेडकरांनी अॅट्रॉसिटी गरीबांसाठी केला आहे. त्याचा गैरवापर केला तर बीड जिल्हा खपवून घेणार नाही असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.

- Advertisement -

आपला पालकमंत्री राज्याला काय देतो?

जनता आपल्या पाठीशी आहे. काम करताना कधीही भेदभाव करायचा नाही. किती योजना आणल्या आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला काय देतो हा हिशोब करायची गरज नाही. आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याला काय देतो, देशाला काय देतो, हा अभ्यास करायची सवय आमच्या बीड जिल्ह्याला आहे. तुम्ही कुठे पदर पसरुन निधी आणण्याची गरज बीड जिल्ह्याला लागलीच नाही. उलट हा जिल्हा सांगायचा जिंतूरला हे द्या परभणीला ते द्या पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते देखील सांगायचे माझ्या मित्राचे गाव आहे त्यांना थोडा निधी द्या असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


हेही वाचा : महाजन, मुंडेंनी युती टिकवली, स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कुणी टाकले? आशिष शेलारांचा सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -