घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरPankaja Munde : 'माझ्या मुलापेक्षा माझ्यावर तुमचा अधिकार जास्त'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : ‘माझ्या मुलापेक्षा माझ्यावर तुमचा अधिकार जास्त’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Subscribe

जेव्हा माझ्या कारखान्यावर कारवाई झाली, त्यानंतर तुम्ही पैसे गोळा करीत असताना माझ्या मुलाने मला फोन करून विचारले की, तु ते पैसे घेणार आहेस का? मी त्याला उत्तर दिले मी पैसे घेणार नाही, पण त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही.

बीड (सावरगाव) : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयादशमीनिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान बाबा भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्याला संबोधित करताना राज्यातील राजकीय परिस्थितीसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. (Pankaja Munde  You have more authority over me than my son Pankaja Mundes emotional condolences to the workers)

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा माझ्या कारखान्यावर कारवाई झाली, त्यानंतर तुम्ही पैसे गोळा करीत असताना माझ्या मुलाने मला फोन करून विचारले की, तु ते पैसे घेणार आहेस का? मी त्याला उत्तर दिले मी पैसे घेणार नाही, पण त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नव्हे तर मी त्याला सांगितले की, माझ्यावर तुझ्या आधी हे लोक माझी जबाबदारी आहेत. तुझ्यापेक्षाही या लोकांचा अधिकार जास्त आहे असेही वक्तव्य यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा : Pankaja Munde ‘आता कुणी कापली माझी वायर’? पंकजा मुंडेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

मी हरले तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यवधी रुपये जमा केले, मी हरले तरी मी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला काही देऊ नका पण माझ्या माणसांची प्रश्न सोडवा. तर ज्यांना पदे दिले ते माझ्या मेळाव्यातून दूर गेले आहेत. मी एखादी निवडणूक हरले असेल पण तुमच्या नजरेत मी पडले नाही. मी तसे कृत्य केले नाही असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हेही वाचा : श्रीकृष्णालाही मथुरेतून द्वारकेत जावे लागले… पंकजा मुंडेंचे मतदारसंघ बदलण्याचे संकेत

आता गोपीनाथ मुंडेंचे स्मारक बनवू नका

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ गड तीन महिन्यात मी बनवला पण, आता इतकी वर्षें झाली तरीही सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे केलेले नाही. आता मात्र, मी सरकारला सांगते की, आता स्मारक बनवूही नका. आता काही तयार करायचं असेल तर शेतकऱ्याचे कष्ट दूर करणारी जादूची कांडी तयार करा. ऊसतोड कामागारांना न्याय मिळेल असे काहीतरी करा असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -