घरक्राइमNIA च्या हाती वाझेंची डायरी; त्या १०० कोटींचं गुपित उघडणार?

NIA च्या हाती वाझेंची डायरी; त्या १०० कोटींचं गुपित उघडणार?

Subscribe

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (NIA) सचिन वाझे यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. एनआयएने वाझेंच्या कार्यालयांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये एनआयएला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. तसंच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले १०० कोटी गोळा करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचे आरोपांचा खुलासा करेल अशी एक वस्तू एनआयएच्या हाती लागली आहे.

एनआयएला तपासात सचिन वाझे यांच्या कार्यलयातून एक डायरी मिळाली आहे. या डायरीमध्ये पैशांच्या व्यवहाराबद्दल एन्ट्री केल्याचं दिसत आहे. तसंच कोडवर्डमध्ये एन्ट्री केल्याचं दिसत आहे. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते, असं एनआयएला वाटत आहे. त्यामुळे ही डायरी १०० कोटींचं गुपित उघडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

हफ्त्याची गुपितं उघडकीस येणार

सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरलं आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -