Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरूपात! छगन भुजबळ यांची घोषणा

आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरूपात! छगन भुजबळ यांची घोषणा

कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश मंगळवारी दिले. कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळीही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

किंमतीमध्ये बदल नाही 

सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात मिळणार असली तरी या थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नियमांचे सर्वांनी करा

- Advertisement -

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

 

- Advertisement -