घरमहाराष्ट्रआजोबा आणि वडीलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही - सुनेत्रा पवार

आजोबा आणि वडीलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही – सुनेत्रा पवार

Subscribe

आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही', असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही असा विश्वास आई सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापोडी येथे बोलत होत्या. यावेळी नगरसेविका माई काटे, महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप उपस्थित होते.

पार्थ पवार नागरिकांचे प्रश्न सोडवतील

बैठकी दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, ‘पार्थ हा शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू हे घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं पार्थ वागणार नाही’, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. ‘नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ हे प्रयत्न करतील अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या’, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

या सरकारच्या काळात नवी शब्द ऐकले

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे. ‘महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती. त्यामुळे पार्थला उमेदवारी देण्यात आली’, असं देखील सुनेत्रा पवार यांनी सांगितले.


तुम्ही हे वाचलंत का? – पार्थ पवार पुन्हा व्हायरल; आता पादरीसोबतच्या ‘या’ फोटोची चर्चा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -