घरताज्या घडामोडीन्युमोनियापासून बालकांचा बचाव करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमात PCV लसीचा समावेश

न्युमोनियापासून बालकांचा बचाव करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमात PCV लसीचा समावेश

Subscribe

बालक जन्मल्यापासून सहाव्या आठवड्यात १४ व्या आठवड्याच आणि नवव्या महिन्यात ही लस देण्यात येणार

राज्यातील बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी विविध लसीकरण कार्यक्रमातून अनेक लसी दिल्या जातात. न्युमोनियापासून बालकांचा बचाव करण्यासाठी आता नियमित लसीकरण कार्यक्रमात PCV लसीचा समावेश करण्यात येणार आहे. (PCV vaccine is included in routine immunization program to protect children from pneumonia) राज्यातील सुमारे १९ लाख बालकांना ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. बालकांना या लसीच्या तीन मात्र देण्यात येणार आहेत. बालक जन्मल्यापासून सहाव्या आठवड्यात १४ व्या आठवड्याच आणि नवव्या महिन्यात ही लस देण्यात येणार आहे. राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यात सुरुवात झाल्यानंतर अभर्कांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होईल असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध असून शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालये त्याचप्रमाणे सत्र आयोजित केलेल्या ठिकाणी सर्वांसाठी ही लस मोफत उपल्बध करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त संचालक डॉ. डी.एन.पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

बालकांना बीसीजी,पोलिओ, रोटाव्हायरस,पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई,डीपीटी यासारख्या लसी नियमित लसीकरण कार्यक्रमात दिल्या जातात. मात्र आता केंद्र सरकाराच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत PCV लसीचा समावेश करण्यात आला आहे. या लसीविषयी आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गंभीर न्युमोनिया होण्याचा धोका हा दोन वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये असतो. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे हा आजार होतो. यामुळे श्वसनमार्गाला संसर्ग होऊन बालकांच्या फुफ्फुसाला सूज येते. एक वर्षाच्या आतील बालकांमध्ये डायरिया आणि न्युमोनिया होऊन ते दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आल्याने राज्यशासनाने डायरियासाठी रोटा व्हायरस लस आणि न्युमोनियासाठी पीसीव्ही लसीचा समावेश केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वीजबिलांच्या थकबाकीतून ३ लाखांवर शेतकरी झाले मुक्त; कृषीपंप वीज धोरणाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -