घरमहाराष्ट्रलांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकलने प्रवास करण्याला परवानगी

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकलने प्रवास करण्याला परवानगी

Subscribe

राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठविला. त्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबईतून रेल्वेने बाहेर गावी जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसने मुंबईत येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन,मदत आणि पुर्नवसन विभागाने रेल्वेकडे केली होती. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेने लांब पल्याच्या प्रवाशांना लोकल प्रवासांसाठी मुभा देण्यात आली आहे.

कोरोनामूळे सध्या फक्त अत्यावश्यक सेवेकरी,महिला,वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लांब लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकलने प्रवास करण्याला परवानगी गाड्यांनी सीएसएमटी,एलटीटी,दादर,पनवेल,मुंबई सेंट्रल,बांद्रा टर्मिनस या स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना लोकलचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे या प्रवाशांना रिक्शा,टक्सी, ओला-उबेर आणि इतर पर्यायी साधनाचा वापर करावा लागतो. परिणामी या प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक होते. त्यामुळे या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने रेल्वेकडे पत्राद्वारे केली होती.

- Advertisement -

राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठविला. त्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता मुंबईतून रेल्वेने बाहेर गावी जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार प्रवाशांना त्यांच्याकडे लांबपल्याच्या रेल्वे गाडीचे तिकीट असणे अनिर्वाय आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे गाडीच्या बॉडिंग वेळेपासून 6 तासाच्या कालावधीत प्रवास करण्याची मुभा आहे. यात प्रवाशांना रिटर्न तिकीट काढता येणार नाही.


हेही वाचा – नाताळच्या सुट्ट्या मिळणार का?; शिक्षकांची शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -