घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपीएफआय प्रकरण; आणखी एका मौलवीला मालेगावातून अटक

पीएफआय प्रकरण; आणखी एका मौलवीला मालेगावातून अटक

Subscribe

नाशिक : पीएफआय संघटनेशी संबंध असलेल्या आणखी एकाला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी (दी.१३) रात्री मालेगावतील मौलवीला अटक करण्यात आली आहे. इरफान नदवी असे या मौलवीचे नाव असून मुंबई एटीएस कडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा एटीएस आणि एनआयए यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या अनेक हस्तकांना ताब्यात घेतले. याचवेळी महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे पीएफआयचे मोठे केंद्र असल्याच छापेमारीमधून समोर आले आहे. याआधीही पीएफआयच्या काही सदस्यांना मालेगावातून अटक करण्यात आली होती. त्याचसोबत त्यांच्या कार्यालय तसेच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पुरावेही हस्तगत करण्यात आले होते. पुन्हा एकदा पीएफआयशी संबंध असलेल्या मौलवीला अटक केल्याने मालेगाव कनेक्शन समोर येत आहे. इमाम कौन्सिलचे अध्यक्ष असलेल्या मौलवी इरफान नदवी यांस मुंबई एटीएस कडून अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -

देशभरात झालेल्या छापेमारी आणि अटकसत्रानंतर स्थानिक पोलिसांनीही काही संशयितांना ताब्यात घेतले होते. अशातच मौलवी नदवी यालाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनंतर नदवी जामीनावर बाहेर होता. तेव्हापासूनच एटीएस आणि पोलिसांची त्याच्यावर बारीक नजर होती. दरम्यात, मागील काही दिवसात त्याच्या हालचाली संशयस्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -