घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याचा अपघाती मृत्यू की घातपात?

पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याचा अपघाती मृत्यू की घातपात?

Subscribe

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू नसून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी दोन तरुणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंत्याचा अपघाती मृत्यू झाला असून त्या मागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना गुरुवारी समोर आली असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवकांत मिरकले, असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. शिवकांत मिरकले आणि त्यांची पत्नी अनुपमा हिंजवडी मधील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. दरम्यान या प्रकरणी सांगवी पोलिसांनी उच्चशिक्षण घेत असलेल्या दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवकांत यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून त्यांचे दोनदा शवविच्छदन करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकांत मिरकले (३८) हे पिंपळे सौदागर येथे राहत असून लातूर हे त्यांचे मूळ गाव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते पिंपरी-चिंचवड मध्ये वास्तव्यास होते. शिवकांत आणि पत्नी अनुपमा हे संगणक अभियंता असून हिंजवडीमध्ये काम करतात. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मयत शिवकांत हे भरधाव वेगात कार चालवत होते. राहत्या सोसायटीच्या काही अंतरावर त्यांनी एका चारचाकीला कट मारला, यामुळे संबंधित चारचाकी चालकांनी त्याचा पाठलाग करत राहत्या सोसायटीच्या गेटच्या आत त्यांना अडवलं. या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर शिवकांत यांनी गाडीच्या डिकीमधून दांडका काढत चारचाकीतील दोन तरुणांना दम दिला. नंतर ते सोसायटीच्या पार्किंगकडे निघून गेले. दरम्यान तरुणांनी हॉकी स्टिक काढत पाठीमागे पळाले, परंतु तोपर्यंत चारचाकी घेऊन शिवकांत पुढे निघून गेल्याचे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

- Advertisement -

दोन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या दरम्यान, पार्किंगच्या दिशेने जात दोन तरुणांनी शिवकांत यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भेटले नाहीत. संबंधित तरुणांनी सुरक्षा रक्षकाकडे जात शिवकांत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संबंधित तरुणांनी सोसायटीच्या व्यवस्थापकाला फोन वरून घडलेली घटना सांगितली आणि सोसायटीमधून ते निघून गेले. त्या दरम्यान शिवकांत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेले ते तिथे सुखरूप पोहचल्याचे सिसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

मात्र पुढे काही पाऊल चालल्यानंतर ते खाली पडल्याचा आणि धापा टाकल्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आला. आवाज ऐकून शेजारी बाहेर आले आणि शिवकांत यांना जिन्याच्या मोकळ्या जागेत बसवले. त्यांचा भुवईच्यावर आणि हनुवटीला जखम झाली होती, काही मिनिटे त्या ठिकाणी बसल्यानंतर शिवकांत यांना त्यांच्या घरात नेण्यात आले. तेव्हा त्यांच्या पत्नीशी त्यांचं बोलणं झालं आणि काही मिनिटे माझी तब्बेत बरी नसल्याचे सांगत शिवकांत यांनी प्राण सोडले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तविली असून त्याचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत. याप्रकरणी घटनास्थळी असणाऱ्या दोन उच्च शिक्षण तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

वाचा – येवल्याच्या भिंगाऱ्यात बहीण भावाची आत्महत्या; घातपाताचा संशय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -