घरताज्या घडामोडीपुणे : 'स्पा मसाज'सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : ‘स्पा मसाज’सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

'स्पा मसाज'सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

‘स्पा मसाज’सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेटची माहिती मिळताच पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले असून यामध्ये सामील असलेल्या सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच अशा कृत्या बद्दल कुणाला माहिती असल्यास तात्काळ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

पिंपरी शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर ३ आणि ४ मध्ये सिटी स्पा मसाज सेंटर या नावाने पार्लर सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपाली मरळ यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून आपल्या सहकाऱ्यांमार्फत छापा मारला. दरम्यान, स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणी सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या राजेश कानुरे, शिवा कोळपे, रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच हे आरोपी मसाज सेंटरमधील तरुणींना वैश्याव्यवसाय करणयासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे या तरुणींकडून देहविक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम चारही आरोपी हे स्वतःची उपजीविका भागविण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! ७ मुलांची आई आणि ७ नातवंडाची आजी पडली २२ वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -