घरमहाराष्ट्रVIDEO: 'घरी रहा' सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दांडक्यानं बेदम मारहाण!

VIDEO: ‘घरी रहा’ सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दांडक्यानं बेदम मारहाण!

Subscribe

मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसतेय. कोरोनासारख्या माहामारीचे गांभीर्य लोकांना अजूनपर्यंत न आल्याने अनेक ठिकाणी करण्यात आलेले नियम सर्रास तोडतांना नागरिक दिसताय. तसेच विनाकारण घराबाहेर पडण्याऱ्यांवर पोलीस देखील कारवाई करत आहेत. घरात सुरक्षित रहा, असं सांगणाऱ्या आणि २४ तास जनतेची सेवा करणाऱ्या या पोलिसांवरच काही ठिकाणी हल्ले होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनाच मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनदरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचे दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाकड पोलीसांनी दिली.

- Advertisement -

असा घडला प्रकार

सोमवारी दुपारच्या सुमारास पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्याचदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काळेवाडी इथल्या मशिदीजवळ या प्रकरणातील आरोपी युनूस आतार हा विनाकारण फिरत होता. पथकातील पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी त्यास घरी जाण्यास सांगितले मात्र युनूसने काहीही न ऐकता वाद घालण्यास सुरूवात केली. वाद सुरू असताना या रागातून युनूस आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काही लोकांनी आपसात पोलीस कळकुटे यांना दांडक्यानं बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, युनूस गुलाब आत्तार, मतीन युनूस आत्तार आणि मोईन युनूस आत्तार हे काळेवाडी परिसरात राहणाऱ्या या तिघांविरुद्ध भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, त्याच बरोबर साथीचे रोग अधिनियमातील कलमानुसार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


घ्या, ट्रम्प म्हणतात, किम जोंग कुठय माहितीये मला, पण मी सांगणार नाही!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -