घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटघ्या, ट्रम्प म्हणतात, किम जोंग कुठय माहितीये मला, पण मी सांगणार नाही!

घ्या, ट्रम्प म्हणतात, किम जोंग कुठय माहितीये मला, पण मी सांगणार नाही!

Subscribe

गेले काही दिवस वर्तमानपत्र, टीव्हीवर कोम जोंग उन यांच्या विषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे

गेले काही दिवस नॉर्थ कोरियाचे किम जोंग उन हे सगळ्यांसाठीच एक रहस्य झाले आहेत. कोणी म्हणालं की, किम जोंग उन यांचा मृत्यू झाला तर कोण म्हणतय किम जोंग उन जिवंत आहेत. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन जीवंत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना केली आहे. मला त्यांच्या तब्येती विषयी सगळं माहिती आहे. पण मी कोणाला आता या विषयी काही सांगणार नाही. व्हाईट हाऊसमध्ये आयोजीत केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. पत्रकारपरिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले, मला पुर्ण खात्री आहे की ते लवकरच बरे होतील, मला माहिती आहे की ते या दिवसात काय करत आहेत. लवकरच मिडीयाला याविषयी माहिती देण्यात येईल.

या आधी ट्रम्प म्हणाले होते की

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषयी माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, मला असं वाटतं किम जोंग उन यांचे रिपोर्ट चुकीचे आहेत. या न्यूजसाठी त्यांनी जून्या दस्ताऐवजचा वापर केला आहे. पण त्यावेली त्यांनी किम जोंग उन यांच्या विषयी तब्येती विषयी बोलणं टाळलं होतं.

- Advertisement -

असे लावले अनुमान

किम जोंग उन गेले काही दिवस उत्तर कोरियातील कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित नव्हते. त्यामुळे किम जोंग उन यांच्या मृत्यू विषयी संशय आणखी वाढला. त्याचबरोबर किम जोंग उन यांच्या १५ एप्रिलला दिवंगत आणि देशाचे संस्थापक किम इल- सुंग यांच्या १०८ व्या जयंती समारंभालाही दिसले नाहीत. ११ एप्रिलला झालेल्या बैठकीत ते शेवटचे दिसले होते. २०१२ नंतर असं पहिल्यांदाच घडलं की किम जोंग उन, किम इल- सुंग यांच्या जयंतीला उपस्थित नव्हते.

गेले काही दिवस वर्तमानपत्र, टीव्हीवर कोम जोंग उन यांच्या विषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे की, कोम जोंग उन त्यांच्या सर्जरी नंतर त्यांची स्थीती अत्यंत नाजूक झालेली आहे. तर काही जणांच म्हणणं आहे की, त्यांच ब्रेन हॅमरेज झालं आहे. मात्र कोणतीच अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये. मात्र साऊथ कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी सांगितले की कोम जोंग उन जीवंत आहेत आणि सुरक्षीत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Lockdown Effect – पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -